संयुक्त 'मानापमान'ची शताब्दी (Manapaman : Khadilkar’s play Celebrates Centenary)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

संयुक्त 'मानापमान'ची शताब्दी (Manapaman : Khadilkar’s play Celebrates Centenary)


'संयुक्त मानापमानया संगीत नाटकाचा प्रयोग हे मराठी रंगभूमीवरील एक विलक्षण 'घटितहोतेतो प्रयोग जुलै 1921 रोजी मुंबईच्या बालीवाला थिएटरमध्ये रंगला होता. त्या प्रयोगाला अनेक व्यक्तीघटनाप्रेक्षकांच्या क्रियाप्रतिक्रियानिर्माण झालेला माहोल यांचे संदर्भ आहेत. ‘संगीत मानापमान’ हे कृ.प्रखाडिलकर यांचे पहिलेच संगीत नाटकत्या नाटकाने रंगभूमीवर अभूतपूर्व असे यश मिळवलेनाटकाचा प्रथम प्रयोग 12 मार्च 1911 रोजी मुंबईत झाला. तेव्हापासून त्या नाटकाला सतत वाढती लोकप्रियता मिळालीत्याला कारणेही तशीच होतीबालगंधर्वांना डोळ्यांपुढे ठेवूनच ते नाटक लिहिले गेले होतेशृंगार आणि विनोद यांनी परिपूर्ण कथानकगोविंदराव टेंबे यांनी त्या नाटकातील पदांना दिलेल्या अप्रतिम चालीधैर्यधर आणि भामिनी या दोन्ही प्रमुख पात्रांना भरपूर गायनानुकूल पदे यांमुळेच संयुक्त प्रयोगासाठी 'मानापमान'ची निवड केली गेली.

'संयुक्त मानापमान'च्या त्या प्रयोगाला राजकीय पार्श्वभूमी होतीलोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. भारतीय राजकारणाची सूत्रे महात्मा गांधी यांच्या हाती आलीत्यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या उदयारंभी टिळक स्वराज्य फंड’ उभा करण्याची कल्पना मांडलीमराठी नाटक मंडळ्यांनी सामाजिक ॠण,  देशाचे ऋण कृतिशीलतेने वेळोवेळी व्यक्त केले आहेफंडाची ती कल्पना पुढे येताच नाट्यक्षेत्रातील संबंधितांनी त्यासाठी आपण काय करू शकतो असा विचार सुरू केला आणि डोळ्यांपुढे कल्पना चमकली - केशव-नारायणाला रंगभूमीवर एकत्र आणले तरकेशवराव भोसले आणि बालगंधर्व, दोघेही उत्तम गायकखूप लोकप्रिय. 'ललितकलादर्शआणि 'गंधर्वया दोन नाट्यसंस्थांचे धुरीणत्या दोघांचे रंगमंचावर एकत्र गायन ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होतीलत्यांच्या नुसत्या एकत्रित प्रयोग करण्याच्या संकल्पनेने लोकांच्या उड्या पडतील असा विचार त्या मागे होता आणि झालेही तसेच.

केशवराव भोसले

त्या प्रयोगात केशवराव भोसले (धैर्यधर), बालगंधर्व (भामिनी), वालावलकर (विलासधर), चाफेकर (अक्कासाहेब), गणपतराव बोडस (लक्ष्मीधरअशी, दोन्ही नाटक मंडळ्यांतून पात्रांची समसमान निवड झालीऑर्गनला पेंढारकर तर तबल्याला राजण्णा रामदुर्गकर होतेपेटीची साथ केशवराव कांबळे यांची होतीप्रयोग जाहीर झाल्याबरोबर गावोगावच्या नाट्यप्रेमी माणसांची तारा-पत्रे तिकिटे राखून ठेवण्यासाठी येऊ लागलीअनेकांची निराशा झाली. कारण नाटकाचा प्लॅन अर्ध्या तासातच संपला तिकिटे पहिल्या रांगेचे शंभर रुपये तर पिटासाठी पाच रुपये अशी होतीउत्पन्न एकूण सोळा हजार रुपये झालेतो त्या काळातील नाट्यप्रयोगाच्या उत्पन्नाचा उच्चांक होता संध्याकाळी साडेसातला प्रयोग सुरू झालातो रात्री अडीच वाजता संपलाप्रेक्षकांनी खचाखच भरलेले प्रेक्षागृह, रंगमंचावर लोकांचे दोन्ही आवडते कलाकार आणि टिळक स्वराज्य फंडासाठी प्रयोग त्यांमुळे प्रेक्षकांच्या उत्साहालाआनंदाला उधाण आले होतेवास्तविक त्या प्रयोगाला महात्मा गांधी यांनी हजर राहण्यास हवे होतेपण त्यांना नाटकाचे वावडे होतेते सत्कार करून घेण्यासाठीही रंगमंचावर आले नाहीतत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नाट्यप्रयोगाचा घाट घातला गेला होता. तो एक प्रकारे विरोधाभासच पण लोकमान्य टिळक यांच्या नावाने फंड जमा करायचा होता आणि लोकमान्यांनी नाटक या माध्यमाची ताकद अचूक जाणली होती.

बालगंधर्व

नाट्यप्रयोगात दोन दिग्गज कलाकार एकत्र आले होते. दोघांच्याही चाहत्यांनी प्रयोगाला, प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी सामन्याचेचुरशीचे स्वरूप आणले. 'गंधर्वआणि 'ललित कलायांच्यात व्यावसायिक स्पर्धा होती, पण वाकडेपणा नव्हता. दोघांनाही एकमेकांच्या कलागुणांविषयी आदर होताकेशवरावांना बालगंधर्वांविषयी आदरयुक्त प्रेम  होतेते बालगंधर्वांना नारायणरावकर्जाची चिंता कसली करतातुम्ही आणि मी एकत्र आलो तर हा हा म्हणता तुमचं कर्ज फेडून टाकू” असे म्हणाले होतेकेशवरावांच्या मनाचा मोठेपणा आणि दोघांमधील सख्यत्वाचे नाते त्यातून दिसतेपण ‘संयुक्त मानापमानप्रयोगाच्या वेळी प्रेक्षकांनी केलेल्या वर्तनाचे ठिकठिकाणचे वर्णन वाचून असे वाटते, की असा संयुक्त नाट्यप्रयोग ठरवताना त्या दोघांच्या चाहत्यांकडून ईर्षेची भावना निर्माण होऊ शकेलत्याचे काही परिणाम होऊ शकतील हा विचार नाटक मंडळींशी संबंधित असलेल्या जाणकार माणसांच्या मनात आला नव्हता. प्रयोग चालू असताना, केशवरावांच्या पदांना त्यांचे चाहते टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद देतबालगंधर्वांच्या गायनाच्या वेळी त्यांचे चाहते जल्लोष करतकेशवरावांच्या गायनाची जातकुळी वेगळीबालगंधर्वांची वेगळी होतीकेशवरावांचे गाणे आक्रमकमर्दानीजोरकस तर बालगंधर्वांचे लडिवाळ, मधुर, आर्जवीबालगंधर्वांची नेहमीची गाण्याची पट्टी काळी दोन तर केशवरावांची पांढरी पाचकेशवरावांनी संवाद साधण्यासाठी त्या नाट्यप्रयोगाच्या वेळी त्यांची पट्टी अर्ध्या स्वराने चढ म्हणजे काळी चार केलीसाहजिक चढ्या पट्टीतील गाणे अधिक परिणामकारक वाटणार विरुद्ध प्रकृतीच्या त्या दोन गायकींत (गायनपद्धतीत) आक्रमक तानबाजी करणारा कलावंत बाजी मारणार हे उघड होतेएकाची आक्रमक शैली आणि दुसऱ्याची मधुर नजाकत असलेली शैली अशा दोन गोष्टी एका रंगमंचावर समोर आल्या तर समूहाच्या मानसशास्त्रानुसार जोरकस व्यक्तीच उठावदार ठरतेत्यामुळे केशवराव भोसले यांच्या गायकीपुढे बालगंधर्व फिके वाटले असतीलमात्र दोघांचेही भक्त स्वत:ची पाठ थोपटून घेत होतेजेथे जेथे संगीत रंगभूमीविषयी लिहिले गेले आहे, तेथे सर्वत्र त्या चुरशीच्या सामन्याविषयी त्यांची त्यांची मतेप्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत.

प्रयोगानंतर, बालगंधर्वांच्या नाटक मंडळीच्या बिऱ्हाडी उदास सामसूम होती असे 'ललित कले'च्या एका नाटककाराने लिहिलेले आहेबालगंधर्व त्या काळात आधीच कर्जबाजारी झाले होतेत्यांनी खाडिलकर यांच्या ‘द्रौपदी’ नाटकाचा नको एवढा भव्यदिमाखदार प्रयोग 12 डिसेंबर 1920 ला करून कर्जाचा बोजा वाढवून घेतला होतात्यांना तशा परिस्थितीत 'संयुक्त मानापमाना'च्या अनुभवाने क्लेश झाले नसतील?....

तरी ‘संयुक्त सौभद्र’ चा प्रयोग 22 जुलै 1921 रोजी झालात्यात केशवराव अर्जुन आणि बालगंधर्व सुभद्रा होते. सुभद्रेला जास्त पदे होती आणि ती लोकप्रियही होतीत्या प्रयोगात बालगंधर्वांनी वाहवा मिळवली, पण त्या प्रयोगाविषयी कोणी विस्तृत लिहिलेले नाहीत्यानंतर दोन महिन्यांतच 4 ऑक्टोबर 1921 रोजी केशवराव भोसले यांचे निधन झाले.

संयुक्त मानापमानमुळे मराठी संगीत रंगभूमीवर उच्च दर्जाचे गायन ऐकण्यास मिळाले. ‘केशव परंपरा’ आणि ‘गंधर्व परंपरा’ यांची उंची अनुभवण्यास मिळालीएक माहोल तयार झालापण त्या ऐतिहासिक घटनेमुळेअवनतीच्या दिशेने वाटचाल करू लागलेली संगीत रंगभूमी सावरलीप्रगती करू लागली असे घडले नाही. उलट, प्रेक्षकांच्या अनिष्ट अभिरुचीचे दर्शन घडलेत्यास जातीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला.

मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage - Rich Tradition)

गडकरी - नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)

- मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com

मेधा वासुदेव सिधये या मराठी विषयाचे अध्यापन, लेखनकार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन आणि व्याख्यानादी कार्यक्रमांतील सहभाग यांत गुंतलेल्या असतात. त्यांचा पीएच डी चा अभ्यास विषय रंगभूमी’ मासिकातील नाट्यसमीक्षा हा होता. त्यांनी नाट्य संमेलनाध्यक्षांची भाषणे (स्वातंत्र्योत्तर ते 2000) या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांचे घाटातले आभाळ आणि रानपाखरं हे दोन बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्या साहित्यवैभव या ग म भ न प्रकाशनच्या दिनदर्शिकेचे संपादन अठरा वर्षांपासून करत आहेत. त्यांचे लेखन आकाशवाणीवर आणि विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या