सप्रेम नमस्कार.
शंभर वर्षांपूर्वी आधुनिक विचारसरणी अंमलात आणणाऱ्या दापोली तालुक्यातील देगावच्या इंदिराबाई गोंधळेकर (https://www.thinkmaharashtra.com/indira-gondhlekar.../) व दाभीळ गावच्या सध्याच्या प्रयोगशील उद्योजक ज्योती रेडीज (https://www.thinkmaharashtra.com/jyoti-redis-lady-with.../) या दोन महिलांच्या कर्तृत्वाची कहाणी ‘थिंक महाराष्ट्र’वर तालुका माहिती संकलन मोहिमेतून प्रसिद्ध झाली आहे. इंदिरा गोंधळेकर यांचा 16 फेब्रुवारी स्मृतिदिन. त्यांच्या नावाने स्मृतिदिनी पुरस्कार दिला जातो.
तालुकावार माहिती संकलन मोहिमेत (https://rb.gy/033wnp) होऊन गेलेल्या व्यक्तींच्या कार्याची तर नोंद (डॉक्युमेंटेशन) घेतली जातेच; त्याचबरोबर सध्या ज्या धडपड्या/कर्तबगार व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्याही कार्याची माहिती मिळवून ती प्रसिद्ध केली जाते. हे ‘थिंक महाराष्ट्र’च्या तालुकावार माहिती संकलन मोहिमेचे वैशिष्ट्य आहे.
यावर्षी ‘थिंक महाराष्ट्र’ने तालुक्याचे समग्र चित्र ही कल्पना स्पष्ट व्हावी म्हणून पाच तालुके मॉडेल स्वरूपात माहिती संकलनास निवडले आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यातील #अचलपूर, जालना जिल्ह्यातील #बदनापूर, अहमदनगर जिल्ह्यातील #शेवगाव, सातारा जिल्ह्यातील #फलटण व रत्नागिरी जिल्ह्यातील #दापोली हे पाच तालुके आहेत. या योजनेला सहाय्य पुण्याच्या ‘परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन’चे लाभले आहे.
यानिमित्ताने पाच तालुक्यांतील लोकांनाही आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या तालुक्यातील व्यक्ती, संस्था, गावे यांची माहिती लिहून ‘थिंक महाराष्ट्र’कडे पाठवावी.
तुमच्या पाहण्यात थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे (www.thinkmaharashtra.com) वेबपोर्टल येते का? कृपया पाहवे / वाचावे. समाजातील विधायकता / चांगुलपणा वाढीस लागावा यासाठी झटणाऱ्या या चळवळीस पाठिंबा द्यावा. पोर्टलवर रोज प्रसिद्ध होणारे लेख मिळण्यासाठी थिंक महाराष्ट्रचे फेसबुक पेज, व्हॉटसअॅप ग्रूप, टेलिग्राम चॅनेल https://t.me/thinkmaharashtra जॉईन करावे. कळावे.
- नितेश / राजेंद्र
थिंक महाराष्ट्र
---------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या