शिव उपासक - शैव संप्रदाय (Worshipping Shiv)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

शिव उपासक - शैव संप्रदाय (Worshipping Shiv)


शैव संप्रदाय हा शिव म्हणजेच शंकराला दैवत मानतो.
त्यांच्या मते, सृष्टीचा निर्माणकर्ता हा शिव आहे.
शैव हा शिवदेवतेला उपास्य दैवत मानणारा संप्रदाय आहे. शिवाची उत्पत्ती प्रागवैदिक काळातील आहे. वैदिक युगाच्या प्रारंभी शिव नावाचा देव आढळत नाही. तथापी शिवलिंग उपासनेचे पुरावे हे हडप्पा संस्कृतीमध्येही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीमधील समाज हा शिवाची पूजा करत असावा असे निदर्शनास आले आहे. शिव देवाचा प्रसार वैदिक साहित्याच्या शेवटच्या भागात झाला. त्या साहित्यात त्याचे वर्णन विध्वंसक आणि संहारक असे आहे. पुढील काळात, उपनिषदात तो भक्तिपंथाचे आराध्य आणि उपास्य दैवत ठरला.
शैव तत्त्वज्ञान बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांपूर्वी निर्माण झाले. बादरायणाचा काळ हा इसवी सनाचे दुसरे शतक असा मानला जातो. शंकराला ऋग्वेदात रुद्र, हर’; अथर्ववेदात भव, भूपती, पशुपती आणि शर्व असे म्हटले गेले आहे. शैव साधू नाथ, अघोरी, अवधूत, योगी, सिद्ध या नावांनी ओळखले जातात. त्यांच्या अंगाला भस्म आणि त्यांच्या केसांना जटा असतात. शैव संप्रदायाची तीर्थस्थाने बनारस, केदारनाथ, सोमनाथ, रामेश्वर, चिदंबरम, अमरनाथ, कैलास मानसरोवर ही आहेत. शिव हा स्वभावाने तापट समजला जातो. परंतु त्याच्या मंदिरांमध्ये थंड, शीतल वातावरण असते.
अर्धनारीश्वर हे शिव आणि पार्वती यांचे एक रूप आहे. तो संप्रदाय भारतात अनेक ठिकाणी होता.
मात्र त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल माहिती उपलब्ध नाही.
विजयनगर साम्राज्याचे प्रधानमंत्री माधवाचार्य (1296 -386) यांनी माहेश्वराच्या (शंकराच्या) नावानुसार चार संप्रदायांचे विवेचन ‘दर्शन’ म्हणून केले आहे - पाशुपत, शैवप्रत्यभिज्ञारसेश्वर हे ते चार संप्रदाय होत. त्याखेरीज कापालिक, कालामुख, हरिहरमार्तंड-भैरवअर्ध-नारीश्वर, नाथ  वीरशैव  असे अन्य काही शैव संप्रदाय आहेत.
पाशुपत दर्शनाचा प्रवर्तक नकुलीश (लकुलीश) हा होय. त्याचा जन्म गुजरातमधील भडोचजवळील कारवान या गावी विश्वराजनामक एका अत्रिगोत्री अग्निहोत्र्याच्या घराण्यात झाला. बहुतेक विद्वानांचा कल त्याचा काळ इसवी सनाचे दुसरे शतक मानण्याकडे आहे. पशुपती हे शिवाचे नाव आहे. पशू म्हणजे बद्घ झालेले जीव आणि त्यांचा पती म्हणजे त्यांचा निर्माता व रक्षणकर्ता. पाशुपतशास्त्र पाच पदार्थांचे आहे - पशू म्हणजे जगपती म्हणजे ईश्वर. पशू (कार्य)पती (कारण)दु:खान्तयोग आणि विधी.
गुजरातमधील सौराष्ट येथे लकुलीशाची शिल्पे आढळतात. मुंबईजवळील घारापुरी लेण्यांमधेही लकुलीशाचे शिल्पांकन पाहण्यास मिळते.
पाशुपत संप्रदायाची काही वैशिष्टये - 1. या संप्रदायात कैलास’ या पौराणिक कल्पनेला स्थान नाही.  2. कितीही तपश्चर्या वा सत्कर्मे केलीतरी ईश्वरी अनुग्रहाशिवाय दु:खान्त वा मोक्ष प्राप्त होत नाही.  3. पाशुपत दर्शन पुनर्जन्माबद्दल स्पष्ट असे काही म्हणत नाही. 4. हे दर्शन सगुण वा निर्गुण उपासना पद्धतींचाही निर्देश करत नाही.   5. उपासकांचा भर ॐकार जपावर असतो. शैव दर्शन मुख्यतः दक्षिण भारतात प्रचलित आहे. दक्षिण भारतात शैव संप्रदायात शंकराचार्यांचे नाव अग्रणी आहे. तेथील शैवांनी बौद्घ आणि जैन या धर्मांना विरोध केला. शंकराचार्य यांनी बुद्धीच्या जोरावर बौद्ध मतांचे खंडन केले. इतर शैवांनी तमिळ भाषेत वाङ्मय निर्माण करून शैव संप्रदायाचा प्रसार, प्रचार केला. त्यामुळे जैन आणि बौद्ध संप्रदाय दक्षिण भारतात बहुतेक ठिकाणी लोप पावले.
तमिळ भाषेत शैवांना नायनार आणि नायनमार असे म्हणतात. शैवपंथात केवळ ब्राह्मण जातीचा समावेश नसून सर्व जातींचे लोक आहेत. तेथे उच्च आणि नीच असा भेदभाव नाही. या संप्रदायाचा प्रसार भारतात अन्यत्रही झाला उदाहरणार्थ बिहारओरिसाकेरळ. नेपाळमधील पशुपतिनाथाचे मंदिर प्राचीन आहे.
            शैव संप्रदायाचा प्रसार नेपाळ, चीन, तिबेट, जावा येथपर्यंत तेराव्या शतकाच्या अखेरीस झाला. तो तेथील शिवमंदिरातील दक्षिण भारतीय संस्कृतीतून दिसतो. ईश्वराचे शरीर ज्या मंत्रांनी बनलेले असते, ते पाच मंत्र असे : 1. ईशान - हा मंत्र ईश्वराचे मस्तक होय. 2. तत्पुरूष - हे ईश्वराचे मुख. 3. अघोर - हा मंत्र ईश्वराचे हृदय होय. 4. वामदेव - हे ईश्वराचे गुह्यस्थान आणि 5. सद्योजात -  हा मंत्र म्हणजे ईश्वराचे पाय. हे शरीर ईश्वराच्या स्वेच्छेने निर्माण झालेले आहे. ह्या शक्तींपासून निष्पन्न झालेले ईश्वराचे शरीर अनुकमे अनुग्रह करणेतिरोधान पावणे (गायब होणे)सृष्टीचा संहार करणेस्थिती राखणे आणि उत्पत्ती करणे ह्या पाच कृत्यांना कारणीभूत होत असते.
महाराष्ट पर्यटन विकास
महामंडळाचे बोधचिन्ह
मुंबईजवळील घारापुरी येथील लेण्यांमधील एक शिल्प प्रसिद्ध आहे. ते महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाचे बोधचिह्न म्हणून परिचित आहे. त्या शिल्पातील तीन मुखे ही अघोर, वामदेव आणि तत्पुरुष यांची असल्याचा विचार डॉ. स्टेला क्रेमरिश यांनी मांडला आहे.
पशू हा विज्ञानाकलप्रलयाकल आणि सकल अशा तीन प्रकारचा आहे (कर्मांचा क्षय विज्ञानयोग आणि संन्यास यांच्या द्वारा किंवा कर्मफलाचा भोग केल्यामुळे होऊन जीव हा केवळ मलरूपी पाशाने युक्त राहतो. हा जीवात्मा विज्ञानाकल होय). प्रलयकाली इतर पाश अस्तित्वात नसल्यामुळे जो मल (अज्ञान) आणि कर्म ह्यांनी युक्त असतोतो पशू प्रलयाकल होय. ह्या दोन प्रकारांव्यतिरिक्त इतर सर्व जीव सकल ह्या प्रकारातील होत. ते मलमाया आणि कर्म अशा तिन्ही प्रकारच्या पाशांनी युक्त असतात. जीवांच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतातत्यांच्या अनुरोधाने परमेश्वर त्यांना वेगवेगळी स्थाने - कोणी विद्येश्वरकोणी मंत्रेश्वर इत्यादी - अर्पण करतो.
पाश हे मलकर्ममाया आणि रोधशक्ती या चार प्रकारचे असते. मल हा दृक्‌शक्ती (ज्ञानशक्ती) आणि क्रियाशक्ती यांना झाकून टाकतो. तो तांब्यावर चढणाऱ्या काळ्या पुटाप्रमाणे आहे. माया ही मूलप्रकृती. प्रलयकाली सर्व जग तिच्यात विलीन होते आणि सृष्टीच्या वेळी तिच्यातून अभिव्यक्त होते. रोधशक्ती ही शिवशक्ती आहे. ती पाशांमध्ये अधिष्ठित होऊन आत्म्याला झाकते, म्हणून तिला पाश म्हटले आहे. बिंदू हा पाचवा पाश. तो कोणी कोणी स्वीकारतात. तो पाश असताही विद्येश्वरपदाची प्राप्ती वा अपर मुक्तीचा लाभ संभवतो. त्या पाश म्हणून त्याची गणना खऱ्या अर्थाने केली जात नाही. बिंदूला शिवतत्त्व असे दुसरे नाव देण्यात आले आहे.
प्रत्यभिज्ञादर्शन ही शैव संप्रदायाची अद्वैतवादी शाखा होय. ती नवव्या शतकात काश्मीरमध्ये उदयास आली. शैव तंत्रागमाचा अनुयायी वसुगुप्त (इसवी सन 825) याने शैवमताला अद्वैतवादी स्वरूप दिले. पुढे, त्या शाखेत मतभेद झाल्यामुळे सोमानंदनाथ (इसवी सन 850) याने त्या पंथाची दुसरी शाखा प्रवृत्त केली. प्रत्यभिज्ञा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची पुन्हा होणारी ओळख. महेश्वराची प्रत्यभिज्ञा म्हणजे त्याच्याकडे (प्रति) अभिमुख झाल्याने (अभि) होणारे ज्ञान (ज्ञा). अगोदरच, ज्ञात असलेल्या वस्तूला समोर आलेली पाहून प्रतिसंधानाने होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यभिज्ञा. प्रसिद्घ पुराणेसिद्घ आगमग्रंथअनुमान इत्यादींच्या द्वारापरमेश्वराच्या ठायी परिपूर्ण शक्ती आहे असे ज्ञान अगोदरच झालेले असते. तो संप्रदाय काश्मीर शैव संप्रदाय म्हणूनही ओळखला जातो.
रसेश्वर’ हे शेवटचे शैव दर्शन मानले जाते. त्या दर्शनात ‘रस’ या शब्दाचा अर्थ पारा. पाऱ्यावर करण्याच्या वेगवेगळ्या प्रकियांच्या द्वारा होणाऱ्या दिव्य देहप्राप्तीवर तेथे भर दिला आहे. तो संसाराच्या पलीकडचा पार देतो, म्हणून तो पार-द. पारदाप्रमाणेच अभ्रकही महत्त्वाचे. पारद महेश्वराच्या बीजापासून निष्पन्न होतोतर अभ्रक हे गौरीच्या बीजापासून निष्पन्न होते. त्या दोहोंच्या योग्य उपयोगाने दिव्यदेह प्राप्त होतो.
वीरशैव’ पंथाच्या नावातील ‘वीर’ या शब्दाचा अर्थ निर्धाराने परमार्थ-प्रवण राहून ईश्वरभक्ती करणारा. त्या पंथाची स्थापना बसवेश्वर (1131-67) यांनी केली. बसवेश्वर यांचा जीवनवृत्तांत बसवपुराणात आला आहे. त्यात मात्र वीरशैव पंथाचा उल्लेख नाही. ‘वीरशैव’ हे त्यांची परंपरा बसवाचार्य यांच्या पूर्वीची असल्याचे मानतात. वीरशैवांनी वर्णव्यवस्थाजातिभेदकर्मकांडांचे स्तोमहिंसाचार यांना विरोध केला. त्यांनी शिवभक्ती, आध्यात्मिकतासामाजिक समानता यांचा पुरस्कार केला. त्या पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार विश्व हे शिवाचे दृश्य रूप आहे. शिव हा त्याच्या शक्तीद्वारे हे विश्व निर्माण करतो आणि यथाकाल त्याचा लयही त्याच्या ठायी घडवून आणतो. शिव सर्वज्ञतर जीव अल्पज्ञतरीही शिव आणि जीव यांच्यात अद्वैत आहे असे ते तत्त्वज्ञान सांगते आणि ते ‘शक्तिविशिष्टाद्वैत’ या नावाने ओळखले जाते. लिंग म्हणजे परमतत्त्वशाश्वत ब्रह्म. लिंगाच्या वरील भागास ‘शिव’, तर खालील पीठाला म्हणजे भागाला ‘शाळुंकाशक्ती’ असे म्हटले जाते. शिवाशी ऐक्य पावण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीच्या सहा पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यासाठी करण्याच्या साधनेस ‘षट्स्थल साधना’ असे म्हणतात. त्या साधनेने वीरशैव व्यक्तीस एकाच जन्मात मुक्ती मिळते असे मानले जाते.
‘कापालिक’ या संप्रदायाचा भर तंत्रमार्गावर आहे. ते माणसाची कवटी जवळ बाळगतात.
कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधना, नरबळी इत्यादींचे प्रस्थ माजले. त्यामुळे तो पंथ पुढे घृणास्पद ठरला.
कापालिक’ हा शैव पंथ पाशुपत संप्रदायापैकी आहे. त्याचा भर तंत्रमार्गावर आहे. ते माणसाची कवटी जवळ बाळगतात. ते त्यातूनच अन्नमद्य-मांस इत्यादींचे सेवन करतातम्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवासचिताभस्माचे लेपनखट्‌वांगधारण इत्यादी गोष्टी करत असल्याचे कूर्म इत्यादी पुराणांत सांगितले आहे. कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधनानरबळी इत्यादींचे प्रस्थ खूप माजले. त्यामुळे तो पंथ पुढे घृणास्पद ठरला. त्या पंथाचे आकारग्रंथ किंवा प्रकरणग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत. तथापि बृहत्संहिता, कथासरित्सागर, गाथासप्तशती, शांकरदिग्विजय व  पुराणग्रंथतसेच  मालतीमाधवप्रबोधचंद्रोदय इत्यादी नाटके यांतून त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळते. ते कपाळावर काळ्या रंगाचा आडवा पट्टा लावतातम्हणून त्यांना ‘कालामुख’ म्हणत. तो संप्रदाय अकराव्या-तेराव्या शतकांत मुख्यतः कर्नाटकात व आंध्रप्रदेशात होता. कालामुख ही पाशुपत संप्रदायाची नष्ट झालेली शाखा आहे.
कालामुख संप्रदाय
कालामुख संप्रदायाचे दोन उपपंथ शक्तिपरिषद व सिंहपरिषद असे होते. त्या संप्रदायाचे संस्थापक-प्रचारक काश्मिरी ब्राह्मण असावेत. ते वर्णभेद न करता सर्वांना ज्ञानदान करत. त्या पंथांच्या आचार्यांची विद्वत्ताआचरण या गोष्टी खास होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांत आदराची भावना होती. कालामुख आणि वीरशैव पंथ यांच्यात वैशिष्ट्ये समान आहेत. कालामुखांची मुख्य देवालयेमठ वीरशैवांच्या ताब्यात आहेत. वीरशैव त्यांना पुण्यक्षेत्रे मानतात. त्या दोन्ही पंथांत लिंगपूजेवर भर आहे. वीरशैव धर्मगुरू आणि कालामुख धर्मगुरू ह्यांना ‘जंगम’ असे समान नाव आहे. कालामुख संप्रदायाची तात्त्विक भूमिका स्पष्ट नाही.
हरिहर’ संप्रदायाची दृष्टी शिव आणि विष्णू ह्यांच्या उपासनांत समन्वय साधण्याची आहे. हरिहराच्या मूर्तीत उजवा भाग शिवाचातर डावा भाग विष्णूचा असतो. गुजरातेतील वीसनगरला हरिहराचे मंदिर असून त्यात काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे. आंध्रमधील तिरूपतीच्या मूर्तीला तमिळी शैव संतकवी हरिहराचे प्रतीक मानतात. कर्नाटकातील बदामी येथील लेण्यांमधेही हरिहराचे शिल्प पाहण्याला मिळते. हरिहराच्या मूर्ती भारताबाहेर जावाकांपुचिया येथेही आढळतात. त्या संप्रदायाचा प्रारंभ इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून झाला असावा. शिव व सूर्य या देवतांचे एकत्व मार्तंड-भैरव या संप्रदायात मानले आहे. मार्तंड-भैरवांच्या मूर्ती या मुख्यतः ओरिसा आणि बंगाल प्रांतांत आढळतात. अशा प्रकारे शिल्पशास्रातही शिवाच्या विविध रूपांना दिलेले मूर्तिरूप भारतातील विविध मंदिरांमधे पाहण्यास मिळते.
अर्धनारीनटेश्वर हाही एक शैव संप्रदाय होय. अर्धनारीश्वराचे वर्णन मत्स्य-पुराणात; तसेच समरांगणसूत्रधारअपराजितपृच्छा यांमध्ये आढळते. त्या मूर्तीचा उजवीकडील अर्धा भाग शिवाचा आणि डावा अर्धा भाग उमेचा असतो. महाराष्ट्र (घारापुरीवेरूळ), राजस्थान, बंगालओरिसाउत्तर प्रदेश (मथुरा)कर्नाटक (बादामी) इत्यादी ठिकाणच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो संप्रदाय पूर्वी भारतात अनेक ठिकाणी होता. मात्र त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल फार माहिती उपलब्ध नाही.
- (संकलित)
---------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या