प्रकाश पेठे |
त्यांचे लेखन
आता फेसबुकवर आले असले तरी यापूर्वी, ते मंगेश नाबर यांनी त्यांच्या 'मैत्री'
नावाच्या 'ऑनलाइन' नियतकालिकात संकलित केले होते व त्यावेळीही त्यांना उबदार
प्रतिसाद मिळाला होता.
पेठे निवृत्तीनंतर बडोद्याच्या दोन-तीन कॉलेजांत 'व्हिजिटिंग फॅकल्टी' म्हणून शिकवत असतात. त्या ओघात त्यांनी बडोद्याच्या सर्व उत्तमोत्तम वास्तूंचा सचित्र इतिहास नोंदणे चालवले आहे. ते त्याचे सादरीकरणही करत असतात. बडोद्याच्या बऱ्याच वास्तू तेथील मूळशंकर दवे नावाच्या आर्किटेक्चर शिकलेल्या आद्य पुरुषाने बांधल्या आहेत. त्यांचा जन्म 1902 चा आणि ते वारले 1962 साली. बडोद्याच्या सयाजीराजे विद्यापीठाच्या उपकुलगुरू हंसा मेहता यांनी दवे यांना बडोद्यात वास्तुकला पदवी कोर्स सुरु करण्यास सांगितले. तो त्यांनी 1954 साली सुरु केला. तसेच, दवे यांनी स्वतःचे ऑफिस काढून बडोद्यात अनेक सुंदर इमारती बनवल्या.
मूळशंकर दवे |
पेठे यांनी
मूळशंकर यांची निर्मिती असलेल्या सर्व वास्तूंचा शोध चालवला आहे. ते मूळशंकर
यांच्याशी संबंधित व्यक्तींना भेटतात. मूळशंकर यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तो
बडोद्यात आला असता पेठे यांनी त्याची भेट घेतली. पण त्याला त्याच्या पिताजींच्या
कर्तबगारीबद्दल फार औत्सुक्य दिसले नाही. पेठे यांचे निरीक्षण मार्मिक आहे. ते
म्हणाले, की आपल्या देशात हजारो इमारती/वास्तू आहेत, की ज्यांचे बांधकामसौंदर्य वैशिष्ट्यपूर्ण
आहे; त्याबरोबर त्यांच्याभोवती इतिहास आहे. ते ऐतिहासिक महत्त्व कसे जपले जाणार?
बदलत्या जगात त्याला काही महत्त्व आहे तरी का?
- दिनकर
गांगल 9867118517
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
मूळशंकर दवे यांनी स्वतःचे ऑफिस काढून बडोद्यात अनेक सुंदर इमारती बनवल्या.
गांधी नगर गृह |
युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन |
प्रकाश पेठे कॉलेजमधील एका चर्चासत्रात
1 टिप्पण्या
छान लेख आहे.
उत्तर द्याहटवा