काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे. ते कारण दुःखद आहे. परंतु हाथरसमध्येच महेंद्र प्रताप सिंग हे थोर स्वातंत्र्यसैनिक जन्माला आले होते. घटना अशी घडली, की मी इंटरनेटवर जुनी पुस्तके शोधत असतो. त्यामध्ये मला राजा महेंद्र प्रताप यांचे एक पुस्तक आढळले. ते आत्मचरित्र आहे - My life story. रास बिहारी बोस या बंगाली क्रांतिकारकाबाबतचा एक लेख अमेरिकेतील सीएनएनमध्ये छापून आलेला माझ्या वाचण्यात आला. तो वाचल्यावर त्यांच्याबद्दल कुतूहल वाढले. म्हणून अधिक शोध सुरु केला तेव्हा राजा महेंद्र प्रताप यांच्याबद्दल काही संदर्भ मिळाले. म्हणून शोध सुरु केला असता 'माय लाईफ स्टोरी' हे पुस्तक नजरेसमोर आले.
महेंद्र प्रताप 1886 साली जन्मले. ते मूळचे मुरसाण या हाथरस जवळच्या संस्थानातील. त्यांचे मूळ नाव खरक सिंग. हाथरस संस्थानच्या राजाला मुलगा नव्हता, म्हणून त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव महेंद्र प्रताप ठेवले. त्यांचे आठव्या वर्षी नियमित शिक्षण शाळेत सुरु झाले. त्यांना घरी हिंदी आणि उर्दू भाषांचे शिक्षक शिकवण्यास येत असत. त्यांचे लग्न पंजाबमधील जिंद या छोट्या संस्थानच्या राजकन्येबरोबर 1902 साली झाले. त्यांनी पदवीधर होण्यापूर्वीच 1907 मध्ये शिक्षणाला रामराम ठोकला. ते त्याच वर्षी पत्नीसह जगाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी त्या आधी 1905-1907 या तीन वर्षांत संपूर्ण भारत बघितला होता. ते कोलकाता येथे भरलेल्या 1906 सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनाला, सासऱ्यांचा विरोध पत्करून गेले होते. ते त्यानंतर स्वदेशीचे पुरस्कर्ते बनले. ते जगाच्या दौऱ्यात नायगरा धबधबा बघण्यास जात असताना, एका कस्टम अधिकाऱ्याने त्यांना म्हटले, की तुम्ही हिंदू तत्त्वज्ञान श्रेष्ठ म्हणता, पण ते तुम्हाला गुलाम होण्यापासून वाचवू शकले नाही.
तो बिंदू महेंद्र प्रताप यांच्या जीवनातील महत्वाचा क्षण ठरला.
त्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे कॉलेज 1909 साली काढले. त्यांनी स्वत सुरु
केलेल्या कॉलेजमध्ये काय सुधारणा करता येतील हे पाहण्यासाठी ब्रिटनमधील औदयोगिक
शहरे प्रामुख्याने बघितली. त्यांनी कॉलेजसाठी इमारत बांधण्यास जागा आणि नित्य खर्चासाठी
पाच गावांचे उत्पन्न लावून दिले. त्यांनी आफ्रिकेत जाऊन गांधीजींना मदत करण्याची
तयारी दर्शवली. परंतु त्यावेळी गोखले यांनी त्यांना परावृत्त केले.
- रामचंद्र वझे 9820946547
vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्ये चाळीस वर्ष काम केले. त्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना त्यांना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्लोज्ड सर्किट', 'शब्दसुरांच्या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकसत्ता' या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
श्री वझे सरांचा हा लेख माहितीपर आहेच.तसेच शोध ,संदर्भ ,माहिती आणि देशासाठी कार्य काल अधोरेखित करत जाणे चिंतनशील वाटले.
उत्तर द्याहटवामहेंद्र प्रताप यांच्या बद्दल मोजक्या शब्दांत दिलेली उत्तम माहिती.
उत्तर द्याहटवालेख आवडला!
Provisional Government Of India या बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
छानच माहिती
उत्तर द्याहटवा