अमित वाईकर |
वुहान
कोरोनामुक्त झाला आहे. त्यांचा फोन तेथून बुधवारी सतरा ट्रेन सुटल्या हे आनंदाने सांगण्यास
आला होता. ते पुन्हा पुन्हा बजावून सांगत होते, की चीनने या रोगाचा उद्भव झाल्या
दिवसापासून त्याच्याविरुद्ध कडक उपाययोजना सुरू केली, महिनाभर लॉकडाऊन केले, वुहानचे
तर रस्ते खोदून टाकले, त्यामुळे तेथील जाणे येणे बंद झाले.
अपर्णा वाईकर |
अमित
म्हणाले, की चीनचे कारस्थान वगैरे अनेक गोष्टी या रोगाबाबत बोलल्या जातात, पण चीनची
स्वतःची कार्यपद्धत गेल्या साठसत्तर वर्षांत निर्माण झाली आहे. ते स्वतःला क्षणात
बांधून घेऊ शकतात. दुसऱ्या क्षणी मोकळे सोडू शकतात. वुहानने स्वतःला तसेच आक्रसून
घेतले. आता मोकळे सोडले आहे, पण त्याचा अर्थ असा नव्हे, की तेथे सर्व तऱ्हेची मुभा
आहे. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होतो. प्रत्येक व्यक्तीची क्यूआर कोडवर सर्व माहिती नोंदलेली असते. ती सतत तपासली जाते. त्यामुळे आजारी माणसाला कोणत्याही
ठिकाणी लगेच बाहेर काढले जाते. क्यूआर कोड हिरवा राखणे ही प्रत्येक नागरिकाची
जबाबदारी असते. काय बिशाद आहे, कोरोना पुन्हा चीनमध्ये येईल! इतका विश्वास अमित
यांच्या बोलण्यात जाणवत होता.
मला अमित
यांचे कौतुक यासाठी वाटते, की त्यांना भारत आणि महाराष्ट्र याबाबत जेवढा अभिमान
आहे, तेवढाच अभिमान त्यांचे कार्यस्थळ असलेल्या चीनबद्दलही आहे. ते म्हणतात, की भारताने
चीनकडून अनेक गोष्टी शिकाव्यात अशा आहेत. वुहान खुले झाले म्हणून जाहीर केल्यावर शनिवार-रविवारी
हजारो लोक तेथे उद्याना-उद्यानांत जमले. पण त्यात धोका संभवतो हे जाहीर करताच लोक
पांगले. कोरोनाचा धोका पुऱ्या मानवजातीला आहे, कोविड-19
वर माणसाने मात केली तरी कोविड-20 संभवतो. तो येण्यास नको असेल तर निसर्गाला जाणुया.
अमित यांचे पुढील वाक्य मला आवडले. ते म्हणाले, we are the virus, corona is cure.
अमित-अपर्णा अनेक तर्हेच्या सामाजिक व सार्वजनिक
कार्यात गुंतलेले असतात. ते चीनमध्ये विविध सभासमारंभ घडवतातच, पण ते नागपूर
फर्स्ट, गर्जे मराठी अशा तऱ्हेच्या मराठी उपक्रमांमध्येदेखील गुंतले जातात. आमची
पहिली ओळख 'गर्जे मराठी' या आनंद गानू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच झाली
होती. अमित यांच्या विविध कार्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे बरेच विषय असतात.
त्यांनी वडिलांचा शायरी करण्याचा वारसा स्वतः उचलला नसला, तरी त्यांच्या संभाषणात
अनेक शेर येतात व त्यामुळे संभाषण रसपूर्ण होते.
अमित वाईकर +8613918228393
-
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या
वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
11 टिप्पण्या
जीथे आपण रोजीरोटी मिळवितो त्या देशाबद्दल कृतज्ञता हवीच व आपल्या मातृभूमी बद्दल ही प्रेम हवे श्री व सौ.वाईकर यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत.खूपच छान! सौ.अनुराधा नरेश म्हात्रे.
उत्तर द्याहटवाVachun khup khup Aanand zala.
उत्तर द्याहटवाVhuan pramane aapan sudha koronala kaymcha sampun taku.
Jay Hind Jay Maharashtra 🌹🚩🚩🚩
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती,धन्यवाद, योग्य मार्गदर्शन मिळाले
उत्तर द्याहटवाWe are virus..Korona is cure..वा. हा लेख चीन बद्दल जे गैरसमज सामान्य लोकांमध्ये आहेत ते खोडून काढण्यासाठी मदत करेल असे वाटते कारण हा "आँखो देखा हाल "आहे..संध्या जोशी.मुंबई
उत्तर द्याहटवाफारच छान लेख .जन्मभूमी आणि कर्मभूमि दोन्हीबद्दल विशेष आस्था हे फार कौतुकास्पद आहे .
उत्तर द्याहटवालेख वाचून करोनाशी लढायला अजून बळ मिळते.
सौअंजली आपटे.
वा खूपच छान लेख,,,,
उत्तर द्याहटवाआपण काय करायला हवं हे कळलं.भारतीय लोकशाहीत ते होईल का?इथे तर जनगणना व नागरिकत्व पडताळणीसुद्धा राजकारण्यांनी लटकवलीय.क्यूआर कोड फारच दूरची गोष्ट झाली.चीनच्या कॅरेक्टर/स्वभावात एक निर्घृणपणा जाणवतो.कदाचित शिस्तीच्या नावाखाली तो झाकला जात असावा?
उत्तर द्याहटवाamazing work Amit and Aparna !!
उत्तर द्याहटवाअमित आणि अपर्णा यांना चीनबद्दल सार्थ अभिमान आहे.
उत्तर द्याहटवाQR कोड बद्दल नव्याने कळले.
Corona प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या आणि त्यालाही जबाबदार असणाऱ्या त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल कुठेही अपराधीपणाची भावना चीनने एकदाही व्यक्त केली नाही याचे मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे कोणी देईल का याचे उत्तर?
नीना आंबेकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर सोबतच्या लिंकवरील लेखावरून तुम्हाला मिळेल.https://www.thinkmaharashtra.org/2020/04/corona-indias-opportunity.html
हटवा