छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे 2022 हे शताब्दी वर्ष आहे. जे कोल्हापुरात कृतज्ञता पर्व म्हणून साजरे केले जात आहे. शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानाचा राजा म्हणून राज्याभिषेक त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी झाला. त्यांनी त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच संस्थानाचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. तो प्रकल्प त्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्णत्वास गेला. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !
संपूर्ण लेख -https://www.thinkmaharashtra.com/कोल्हापूर-मिरज-रेल्वेचा/
0 टिप्पण्या